Tuesday 15 March 2016


महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ,1966

36-अ जमातीतील व्यक्तिकडून  करण्यात येणाऱ्या  वाहिवाटीच्या  हस्तांतरणावर  निर्बंध:
(1)अ.ज.च्या व्यक्तीची / जमातीतील व्यक्तीची  कोणतीही वहिवाट/जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि  कुळवहिवाट (सुधारणा) अधिनियम ,1974 याच्या प्रारंभापासून म्हणजे दिनांक 6.7.1974 पासून  शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय  जमातेतर व्यक्ती, संस्था यांना विक्रीद्वारे , देणगी देऊन, अदलाबदल करून, गहन ठेऊन, पट्यानें देऊन किंवा अन्य प्रकारे हस्तांतर केली जाणार नाही.
      (1ब)परंतु  ज्या गावात  वहिवाट असेल आणि वहिवाट  त्या गावातील किंवा गावाच्या 5 की.मी. अंतरापर्यँत राहणाऱ्या  कोणत्याही जमातीतील व्यक्ती , पट्ट्यावर, गाहणाने, विक्रीद्वारे किंवा अन्य रीतीने घेण्यास तयार नसेल तर त्या बाबतची जिल्हाधिकाऱ्यांची  खात्री झाली असेल ,तर तो अशा विक्रीस  परवानगी देऊ शकेल.
( 2) जिल्हाधिकारी विहित करण्यात येईल अशा  शर्तीस अधीन राहून  पूर्व मंजुरी देईल.
(3) पट्ट्याच्या किंवा गहाण खताचा कालावधी संपल्यानंतर  जिल्हाधिकारी  , प्रचलित कायद्यात किंवा निर्णयात काहीही अंतर्भूत असले तरी वहीवाटीचा कब्जा जमातीतील व्यक्तीस परत देईल.
(4)  महाराष्ट्र जमीन महसूल संहिता  आणि कुळवहिवाट अधिनियम, 1974 याच्या प्रारंभीच्यावेळी  किंवा तदनंतर  कलम 36- अ (1) चे उल्लंघन करून  कोणतीही वहिवाट  हस्तांतरित झाल्याचे दिसून आल्यास , जिल्हाधिकारी  स्वअधिकारे  किंवा  हितसंबंधीत कोणत्याही  व्यक्तीने 6.7.2004 पासून  तीस वर्षाच्या आत  अर्ज केल्यावर  चौकशी करून  त्या बाबीचा निर्णय देईल.
(5) पोटकलम 36अ(1) चे  उल्लंघन करून वाहिवाटचे कोणतेही  हस्तांतरण  करण्यात आले आहे असा  निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर  वहिवाट , वहिवाटीवर   पिके असल्यास , सर्व भारतापासून मुक्त , राज्यशासनाकडे निहित होईल .
(6)पोटकलम (5)अन्वये  शासनाकडे निहित झालेल्या  कोणत्याही वहीवाटीचा  विनियोग  करावयाचा असेल  तर, जिल्हाधिकारी  अ ज.तीतील  हस्तांतरकास  लेखी नोटीस देईल आणि तीद्वारे  तो ती जमीन खरेदी करण्यास  तयार आहे  किंवा नाही  याबद्दल  त्यास नोटीस मिळाल्याच्या  तारखेपासून 90 दिवसाच्या आत  कळविण्यास त्यास भाग पाडील. हस्तांतरक  जर वहिवाट विहित किमतीस खरेदी करण्यास तयार असेल व जमीन लागवडीची हमी देत असेल  तर त्यास वहिवाट  मंजूर करण्यात येईल. मात्र अशा  हस्तांतरकाने धारण  केलेली एकूण जमीन निर्वाहक क्षेत्रापेक्षा  जास्त  असणार नाही.
एकनाथ भोये

23 comments:

  1. सर माझी जमीन 36 अ कलमानुसार आहे तर मला माझ्या कुंटुबात वाटणी करता येईल का

    ReplyDelete
  2. कृपया मला सांगा

    ReplyDelete
  3. सर मी 36अ मधील दोन गुंठे जागा घेतली आहे तर ती जमीन नावावर करता येईल का?मी सुद्धा आदिवासी आहे.कृपया माहिती द्यावी

    ReplyDelete
  4. Sir maji jamin vadiloparjit ahe parantu ti jamin majhya vadilane gavatil savkarala khush karedi ahe sadar jaminivar mazach kabja ahe sadr jaminit mi tahate ghar bandhale ahe tari upay sangava maza namber 9370700548

    ReplyDelete
  5. Sir maji 36 a madil vadiloparjit jamin aahe mi aadivashi nahi jamin navavar karta yeil ka

    ReplyDelete
    Replies
    1. सर जागा बिगर आदिवासी ला विकली असेल तर जागा वापस मिळते का

      Delete
  6. मलाआदिवासी जमिनधारक पॉवर ऑफ ऑटर्नि लिहुन देत आहे, ती चालेल का?
    कृपया मार्गदर्शन करावे

    ReplyDelete
  7. सर मी पण आदिवासी आहे माझ्या वडिलांनी पाटिल समज्यच्या व्यक्तिला 1996मधे गहाण म्हणून ठेवलेली जमीन त्या लोकानी नावावर करुन घेतली आहे मी त्या वर 2017ला केस टाकली आहे निकाल प्रांत साहेबांचा माझ्या बाजुने लागलेला आहे पण त्यानी अपील करत केस अजुन चालू आहे मी काय करावे 🙏

    ReplyDelete
  8. Sir Mazi jaga bigar adivasi ne vadilakadun gheun shet jaminit ghar bandhale ahe tri ti jaga mla punha milel ka Kay karvi krta yeil tyanchya

    ReplyDelete
  9. Sir Mazi jaga bigar adivasi ne vadilakadun gheun shet jaminit ghar bandhale ahe tri ti jaga mla punha milel ka Kay karvi krta yeil tyanchyavar.

    ReplyDelete
  10. सर मी एक आदिवासी आहे. माझ्या आजोबा ला 1947 च्या आधी दान मिळालेली जमिनीवर आम्ही राहत अहो आणि अता ते जमीन वापस द्या मनत आहे तर कायद्या नुसार जमिनी वर कोणाचा हक राहील

    ReplyDelete
  11. 36a madhil jameen var ghar pandhare te vikat kheta yeil ka mazya navavar bond hoil ka???

    ReplyDelete
  12. Sir mazya vadilani 36A madhil jamin 1999 registered vikri keli hoti pan 2020 la kabza gheun talathi Kade nond ghatli mala jamin parat milavanya sathi Kay karata yeil sir please margadarshan kara

    ReplyDelete
  13. 1974 कायदा नुसार 1974 चा आघोदरचे खरेदीखत वैद्य आहे का?

    ReplyDelete
  14. आदिवासीशीची परवानगी आणल्यानंतर व्यक्ती मयत झालेला आहेव 7/12 वारसांची नावे आहेत परवानगी पुन्हा आणावी लागणार का

    ReplyDelete
  15. 36 व 36अ चे कलम 7/12 वर नोंद घेण्याचे कायरवाही सांगावी

    ReplyDelete
    Replies
    1. माहीती मिळाली असेल अ
      तर सांगा

      Delete
  16. सर मि आदिवासी आहे मि माझ्याच भावबंदिकीची जमिन 1980 विकत घेतली होती परंतु नावावर केली नाही परंतु 1992 पासुन त्या 7/12 वर माझ्याच नावाने आजपर्यत पिकपानी आहे तर माझ्या नावे करायला काय प्रोसेस करावि लागेल मला

    ReplyDelete
    Replies
    1. Vikat۔kashi ghetli۔
      Konte pepar banvile
      Ragistery zali ki nahi.
      He samzun ghya

      Delete
  17. आदिवासींनी हक्क सोड लेख कसा करायचा ते सांगा सर

    ReplyDelete