महाराष्ट्र जमीन महसूल संहिता ,1966
36-अ जमातीतील व्यक्तिकडून करण्यात येणाऱ्या वाहिवाटीच्या हस्तांतरणावर निर्बंध:
(1)अ.ज.च्या व्यक्तीची / जमातीतील व्यक्तीची कोणतीही वहिवाट/जमीन , महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळवहिवाट (सुधारणा) अधिनियम ,1974 याच्या प्रारंभापासून म्हणजे दिनांक 6.7.1974 पासून शासनाची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय जमातेतर व्यक्ती, संस्था यांना विक्रीद्वारे , देणगी देऊन, अदलाबदल करून, गहन ठेऊन, पट्यानें देऊन किंवा अन्य प्रकारे हस्तांतर केली जाणार नाही.
(1ब)परंतु ज्या गावात वहिवाट असेल आणि वहिवाट त्या गावातील किंवा गावाच्या 5 की.मी. अंतरापर्यँत राहणाऱ्या कोणत्याही जमातीतील व्यक्ती , पट्ट्यावर, गाहणाने, विक्रीद्वारे किंवा अन्य रीतीने घेण्यास तयार नसेल तर त्या बाबतची जिल्हाधिकाऱ्यांची खात्री झाली असेल ,तर तो अशा विक्रीस परवानगी देऊ शकेल.
( 2) जिल्हाधिकारी विहित करण्यात येईल अशा शर्तीस अधीन राहून पूर्व मंजुरी देईल.
(3) पट्ट्याच्या किंवा गहाण खताचा कालावधी संपल्यानंतर जिल्हाधिकारी , प्रचलित कायद्यात किंवा निर्णयात काहीही अंतर्भूत असले तरी वहीवाटीचा कब्जा जमातीतील व्यक्तीस परत देईल.
(4) महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि कुळवहिवाट अधिनियम, 1974 याच्या प्रारंभीच्यावेळी किंवा तदनंतर कलम 36- अ (1) चे उल्लंघन करून कोणतीही वहिवाट हस्तांतरित झाल्याचे दिसून आल्यास , जिल्हाधिकारी स्वअधिकारे किंवा हितसंबंधीत कोणत्याही व्यक्तीने 6.7.2004 पासून तीस वर्षाच्या आत अर्ज केल्यावर चौकशी करून त्या बाबीचा निर्णय देईल.
(5) पोटकलम 36अ(1) चे उल्लंघन करून वाहिवाटचे कोणतेही हस्तांतरण करण्यात आले आहे असा निर्णय जिल्हाधिकारी यांनी दिल्यानंतर वहिवाट , वहिवाटीवर पिके असल्यास , सर्व भारतापासून मुक्त , राज्यशासनाकडे निहित होईल .
(6)पोटकलम (5)अन्वये शासनाकडे निहित झालेल्या कोणत्याही वहीवाटीचा विनियोग करावयाचा असेल तर, जिल्हाधिकारी अ ज.तीतील हस्तांतरकास लेखी नोटीस देईल आणि तीद्वारे तो ती जमीन खरेदी करण्यास तयार आहे किंवा नाही याबद्दल त्यास नोटीस मिळाल्याच्या तारखेपासून 90 दिवसाच्या आत कळविण्यास त्यास भाग पाडील. हस्तांतरक जर वहिवाट विहित किमतीस खरेदी करण्यास तयार असेल व जमीन लागवडीची हमी देत असेल तर त्यास वहिवाट मंजूर करण्यात येईल. मात्र अशा हस्तांतरकाने धारण केलेली एकूण जमीन निर्वाहक क्षेत्रापेक्षा जास्त असणार नाही.
एकनाथ भोये