Wednesday, 27 January 2016

 सोंगी मुखवट्यांना पहिले पारितोषिक
 




दिल्ली येथे प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात नाशिकच्या आदिवासी तरुणांनी सादर केलेल्या सोंगी मुखवट्यांचा गौरव झाला आहे. संचलनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक या लोकनृत्याला जाहिर झाला असून पंतप्रधान मोदींनीही या लोकनृत्याचे फोटो ट्विट केले आहेत. त्यामुळे या लोकनृत्याने महाराष्ट्राच्या चित्ररथाची कसर भरून काढतानाच घवघवीत यशही संपादन केले आहे.
प्रजासत्ताक दिन संचालनात महाराष्ट्राचा चित्ररथही नव्हता. त्यामुळे महाराष्ट्रात काहीशी नाराजी होती. पण, नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील ढाब्याचा पाडा येथील १६ जणांचा गट संचलनात 'सोंगी मुखवटे' हे लोकनृत्य सादर करीत होता. या लोकनृत्याने अवघ्या देशवासीयांचे लक्ष वेधून घेतले. जवळपास दोन मिनिटांचे सादरीकरण पथकाने केले

नागपूर येथे मुख्यालय असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे २० पालिका शाळांमधील १५० विद्यार्थ्यांना या नृत्यासाठी तयार कण्यात आले. त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी व त्यांच्या समवेत नृत्य करण्यासाठी धाब्याचा पाडा येथील या १६ आदिवासी युवकांना पाचारण करण्यात आले होते. काही दिवसातच युवकांनी हे नृत्य शिकविले. परंतु, त्यात काही बदल करण्यासाठी मुंबईहून कोरिओग्राफरही बोलाविण्यात आले. त्यात अरविंद राजपूत यांनी थोडे बदल करीत मुलांना नृत्य शिकवले. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून तयारी सुरु होती. दिल्लीत वीस दिवस तालीम केल्यानंतर संचलनामध्ये १६६ जणांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केले. या लोकनृत्याला ६६व्या प्रजासत्ताक संचालनातील पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक घोषित करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांनी कलर्स ऑफ इंडिया या त्यांच्या ट्विटमध्ये या आदिवासी लोकनृत्याचे फोटोही ट्विट केले आहेत. यामुळे आदिवासी लोकनृत्याचा गौरव होतानाच त्याची प्रसिद्धीही झाली आहे.

----- Abhinandan !! Feeling Proud !

Monday, 25 January 2016

कार्तिकस्वामी आदिवासी  बहुद्देशीय मंडळ म्हसरुळ (नाशिक) व समाज भुषण डॉक्टर

 यांचे संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी  शिबीर


मौजे ठाणगाव , ता. सुरगाणा येथे जि.प.प्रा. शाळेत  रविवार दिनांक 7/02/2016 रोजी आयोजित केला असून परिसरातील सर्व बांधवांनी  आपल्या आरोग्याची मोफत तपासणी करुण  या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे नंम्र  आवाहन कार्तिकस्वामी  आदिवासी बहुद्देशीय मंडळातर्फे करणेत येतआहे.





 67 वा  प्रजासत्ताक दिन उत्साहात  साजरा
अखंड भारताचा 67 वा प्रजासत्ताक दिन  26/01/2016  कार्तिकस्वामी आदिवासी  बहुद्देशीय मंडळ म्हसरुळ (नाशिक)  च्या  प्रांगणात  उत्साहात  संपन्न  झाला.

                 सकाळी  7.30  वाजता मा. सौ. रंजनाताई  भानशी  व  सौ. शालीनीताई  पवार  नगरसेवीका  यांच्या  हस्ते  ध्वजारोहन  झाले. यावेळी  मा. श्री. अरुण  पवार माजी  नगरसेवक, श्री. आनंदराव गायकवाड  अध्यक्ष श्री.लक्ष्मणराव  बहिरम ,श्री .डी.पी. जाधव ,श्री. राजाराम  बागुल, श्री .नारायण  कनोज, श्री. शंकरराव  वाघेरे सर ,श्री .डी. एल. जोपळे, श्री . पी. ए. गायकवाड, माजी उपजिल्हाअधिकारी, श्री हिरामण बहिरम, श्री. पोपटराव  भानशी, श्री. पी.के. सापटे, सौ. विमलताई बागुल  माजी  जि.प. सभापती  नाशिक , श्री जयवंत  बागुल.  हे उपस्थित  होते.